कुठलीही पूर्वग्रहदुषित मत न बाळगता, एका वाक्यात सांगायचं झालं, तर फक्त नाना काय तो 'आपला मानुस' वाटतो. आजकाल social media मुळ सोसणार नाही इतकी क्रियाविशेषण आणि विशेषण लावून एखाद्या सिनेमाच प्रोमोशोन केल जात. त्यात गैर काहीच नसत. पण नाना पाटेकरांसारखा एखादा नट जेव्हा आपल्या सहकलाकारांच तोंड भरून कौतुक करतो, तेव्हा काकणभर जास्तच अपेक्षा वाढलेल्या असतात, असाव्यात. पण सिनेमात तितकासा सहज आणि खिळवून ठेवणारा अभिनय नानाशिवाय कोणी केलेला आढळत नाही. 'नात्यांची गुंतागुंत आणि वाढत गेलेला तिढा', अश्या भयानक वाक्य रचानांपेक्षा मी तिकीट काढलेले पैसे वसूल होतायत का, हा प्रत्येक सिनेमा बघणाऱ्या माणसाचा विचार असतो. आणि review मध्ये कथानक नव्हे तर सिनेमा का पाहावा किंवा पाहू नये हे सांगायचं असत हे कित्येक वेळा लोक विसरून जातात....असो. तर पूर्वार्धातले नानांचे सुमित राघवन आणि इरावती हर्षे ह्यांच्या सोबतचे one-to-one संवाद असणारे दृश्य नक्कीच बघण्यासारखे आहेत. Thriller जरी असला तरी सुरवातीचे आणि काही अधूनमधून असलेले नानाचे संवाद मधूनच गुदगुल्या करून जातात. मुळात नाटकावर ब...