Links to the videos that I have worked on with proof of work:
I will keep optimizing how the blog is displayed with time. Till then, click on the images to view the respective episode. It is in Marathi. Wrote comedy based script for the creator.
हा प्रश्न वाचून हा निखिल वागळेंच्या आजचा सवाल मधला कौल वाटला असेल कदाचित. पण हा खरोखर महत्वाचा प्रश्न आहे. परवा जागतिक मराठी अकादमी संयोजीत राज ठाकरे आणि शरद पावरांमध्ये एक परिसंवाद घडवून आणला होता. त्यात मराठीला अनुसरून अनेक मुद्दे उपस्थित केले होते. राज ठाकरे प्रातिनिधिकहुनही अधिक स्वरूपात मराठी साठी काम करत असतील, नसतील. पण मूळ मुद्दा असाय की आपण मराठीसाठी काय करतोय? मराठीचा केवळ प्रतिकात्मक पुरस्कार करून काई फरक पडू शकतो का? तर त्याचं उत्तर होय असं आहे. पण ते काई काळासाठी. कालांतराने त्यात विस्मृती येत जाईल. बरंच काई करण्यासारखं आहे. मराठी राजभाषा दिन म्हणजे कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांची जयंती. मराठीबद्दल कुठलाही दिखाऊ अभिमान आणि इतर भाषेचा द्वेष न बाळगता आपण भाषेची वाढ कशी शकतो ते पाहणं महत्वाचं ठरतं. कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणीत मराठीबद्दल, मराठी भाषेच्या वृद्धिबद्दल भाष्य केले आहे: परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देश ही मरतो गुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतीचे शीर कापू नका! ...
Comments
Post a Comment