फारसा कृष्ण नसला तरी सावळा रंग. चेहऱ्यावर स्मित आणि दिलखुलास राजकारणी असल्याचं दर्शवणार बोलणं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात जवखडा नावाचं ह्यांच गाव. राजकारणात जेव्हा पाटील साहेब येत होते तेव्हा चारशे वस्ती असलेलं. त्यात 'ह्यांच्याच' गोतावळा 60 जणांचा. पण राजकारणात यायची इच्छा आणि घरात जनसंघाची विचारधारा ह्यातून तयार झालेले रावसाहेब.
खरं पाहता 'रावसाहेब' हा शब्द मी ह्याधी पहिला आणि शेवटचा पु.लंच्या व्यक्तिचित्रणात ऐकला होता. पण त्या सदैव 'तिखट' आणि ह्या 'कधीतरी तापट' असणाऱ्या रावसाहेबांमध्ये बराच फरक जाणवला. पाटील साहेबांची मला सगळ्यात रुचलेली गोष्ट म्हणजे- त्यांनी आपल्या गावची भाषा सोडलेली नाही. परुळेकर सरांनी ST एकदा तरी गावात यायची काअस विचारल्यावर साध्या आणि मिश्किल भाषेत पाटील साहेब उत्तरले-"आमच्या गावच्या मारुतीन एसटीच बगीतली नव्हती". तितक्याच मिश्कीलपणे ते पंचायत सभापती झाले असताना त्यांच्या मित्रांना बसत नव्हता आणि त्यांनी ते कसं पटवून दिलं हे ही सांगितलंय.
पण हा गावचा हेल जितका शाबित ठेवलाय तितकाच हा माणूस प्रसारमाध्यम आणि तत्सम social media ला जास्त बधलेलाही वाटत नाही आणि रुळलेला ही नाही. त्या कुर्त्यावरच्या ओव्हरकोट मधल माईक सारख सावरतायत, असं मला उगीच त्यांच्या हावभाव बघून वाटत होतं. पण ह्या मीडिया पेक्षा मला माझा कार्यकर्ता महत्वाचा आणि हे सगळं दिव्य मला मुंबईत आल्यावर कळलं, ह्या दोन्ही वाक्यात conviction आणि candidness, दोन्ही वाटत होता.
मुंडे साहेब आणि प्रमोद महाजनजी हे माझ्याहून अनुक्रमे 5 आणि 10 वर्षांनी मोठे. भाजपचा 20-22 वर्षाचा तरुण काँग्रेसबहुल भागातून निवडून आल्यावर दोघांनी त्यांची भेट घेतली आणि नंतर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रावसाहेब पाटील दानवे आणि जयसिंगराव गायकवाड ह्यांची एक फळी कशी तयार झाली हे ही सांगितलं.
1985-90 आणि तदनंतर 1990-95 च्या राजकारणामधली स्थित्यंतर, पैशाचं राजकारण, कार्यकर्त्यांबद्दल अनास्था ह्याचा आलेख सांगितला. त्याचबरोबर आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत तीन पिढ्या अनुभवल्याचंही सांगितलं. दिल्ली मधल्या धोब्याचा पोरग्या नंतर MCD election ला उभा राहतो, तोच पैसे आणि नावाच्या जोरावर राजकारण करणारे तत्सम celebrity टिकाव धरत नाहीत, हे ही नमूद केले.
बदलत्या राजकारणासोबत आणि एकंदर परिस्थिती सोबत बदल हवा असतो हे ही सांगितलं. पण फारश्या झोतात न आलेल्या, क्वचित कधी आपल्या वक्तव्यांवरून टीकाही सहन केलेल्या, सध्या महाराष्ट्र भाजपचे अध्यक्षपद भूषवित असणारे रावसाहेब दानवे-पाटील, हे मुलाखत बघितल्यानंतर तरी एक मुरलेले राजकारणी संभवतात!!
(मी शब्द तसे जपून वापरतोय, ह्याचा विपर्यास कृपया करू नये!! सोबत मुलाखतीची विडिओ लिंक दिलीय.)
राजू परुळेकरांनी घेतलेली रावसाहेब-पाटील दानवे यांची मुलाखत
Comments
Post a Comment