हा प्रश्न वाचून हा निखिल वागळेंच्या आजचा सवाल मधला कौल वाटला असेल कदाचित. पण हा खरोखर महत्वाचा प्रश्न आहे. परवा जागतिक मराठी अकादमी संयोजीत राज ठाकरे आणि शरद पावरांमध्ये एक परिसंवाद घडवून आणला होता. त्यात मराठीला अनुसरून अनेक मुद्दे उपस्थित केले होते. राज ठाकरे प्रातिनिधिकहुनही अधिक स्वरूपात मराठी साठी काम करत असतील, नसतील. पण मूळ मुद्दा असाय की आपण मराठीसाठी काय करतोय? मराठीचा केवळ प्रतिकात्मक पुरस्कार करून काई फरक पडू शकतो का? तर त्याचं उत्तर होय असं आहे. पण ते काई काळासाठी. कालांतराने त्यात विस्मृती येत जाईल. बरंच काई करण्यासारखं आहे.
मराठी राजभाषा दिन म्हणजे कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांची जयंती. मराठीबद्दल कुठलाही दिखाऊ अभिमान आणि इतर भाषेचा द्वेष न बाळगता आपण भाषेची वाढ कशी शकतो ते पाहणं महत्वाचं ठरतं. कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणीत मराठीबद्दल, मराठी भाषेच्या वृद्धिबद्दल भाष्य केले आहे:
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरीमाय मराठी मरते मरते इकडे परकीचे पद चेपू नकाभाषा मरता देश ही मरतोगुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतीचे शीर कापू नका!
परभाषेत पारंगत होणं महत्वाचं आहेच. पण मराठी आपली आहे ह्याची जाण ठेवणं, वाढवणं हे वाक्य जितकं नाटकी वाटतय त्याहूनही महत्वाचं आहे. म्हणजे साधारणपणे 7व्या वर्षात असलेला मुलाला इंग्रजी शाळेत घालण्याचा अट्टाहास कधीही चुकीचा नाही, तो पालक म्हणून मनात असणं हे बरोबरच आहे. त्याला/तिला इंग्रजी व्यावहारिक पण मराठी मातृभाषा आहे ह्याची जाणीव करून देणं महत्वाचं ठरतं. कुठलाही दुराभिमान न बाळगता सांगतो, जेव्हा मला किंवा समोरच्याला एका वाक्यात एखादातरी इंग्रजी शब्द घालवाच लागतो तेव्हा आपली भाषेबद्दलची हतबलता दिसून येते. संध्याकाळच्या वेळी देवापुढे बसून प्रार्थना म्हणणे हा जितका देव मानण्या-न मानण्याचा भाग होता त्याहूनही अधिक तो भाषा टिकवण्याचा एक प्रयत्न होता. अजूनही तो होऊ शकतो, करणं पालकांच्या हातात आहे.
![]() |
Oblige but make him/her learn!! |
ह्याउपर अमराठी जनतेला मराठीबद्दल आकर्षण निर्माण करणं हे जास्त सकारात्मक असेल हे नक्की. फार काही चळवळ वगरे उभी करण्याची गरज नाही. पण तुमच्या निदान एक ते दोन अमराठी मित्रांना बोललेलं कळावं इतकी तरी मराठी शिकवा. माझ्या वयातल्या प्रत्येकाला शिव्या हा कुतूहलाचा विषय असतो(वाचायला कितीही विचित्र वाटत असेल कदाचित, तरी हे खरं आहे).मराठी शिव्या हा म्हणजे अमराठी लोकांना जिव्हाळ्याचा विषय असू शकतो (फक्त त्याचा वापर तुमच्यावरच अधिक व्हायला नको!!😂).
सोशल मीडिया हे देखील मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक महत्वाच माध्यम असू शकतं. माध्यम अनेक आहेत, त्यांचा यथायोग्य वापर करणं आपल्या हातात आहे. बाकी जैसी 'श्रींची' इच्छा, तैसेंच होईल!!
Comments
Post a Comment