ताम्हिणीत पावसाळ्यात प्रवास म्हणजे धुकं आणि पावसाचं विलोभनीय मिश्रण असतं. तुमच्या-माझ्यातली हे सगळं अनुभवण्याची उत्सुकता कमी-जास्त होऊ शकते कदाचित. पण लहानग्यांच्या डोळ्यातलं ते भाव विश्व पाहून मी तर हरखून जातो.
माझ्या साधारण एक हाताच्या अंतरावर बशीत एक चिमुरडी आणि तिची आई बसली होती. डोक्यावरची ती antenna सारखी ponytail 'ती' चुणचुणीत असल्याची साक्षच देत होती.
खिडकीच्या काचेतून बाहेर फक्त दाट धुकं, धबधबे,हिरवीगार झाडं असच चित्र. ते पांढरफट(खास मराठवाडी शबुद) धुकं पाहून ती आईला म्हणाली "ते बघ आईग बाहेर धुकं पडलंय" आणि आपसूकच गोड हसलीही.
पण ह्या सगळ्यात मला 'ती' एवढे सगळे शब्द बिनचूक, अस्खलित मराठीत बोलली ह्याचं जास्त अप्रूप वाटलं.
5 शब्दांच्या वाक्यात किमान 2-3 इंग्रजी शब्द हवेत हा अजकालचा दंडक आहे म्हणतात. त्यात लहानमुलाना पालक शाळेत घाळण्याआधी किमान 5 इंग्रजी अवघड शब्द शिकवून घालतात म्हणे आजकाल.
असो, "मराठी" अबाधित राहावी,राहो, आणि राहिलंच. आणि हो आज राजसाहेब येतायत फे.बुवर. राजकीय कंगोरा सोडून ह्यात बरंच काही 'मराठी' असेल. जरूर पाहण्यासारखं काहीतरी. एक चाहता म्हणून हा शेवटचा उतारा लिहतोय....
Comments
Post a Comment