फारसा कृष्ण नसला तरी सावळा रंग. चेहऱ्यावर स्मित आणि दिलखुलास राजकारणी असल्याचं दर्शवणार बोलणं. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात जवखडा नावाचं ह्यांच गाव. राजकारणात जेव्हा पाटील साहेब येत होते तेव्हा चारशे वस्ती असलेलं. त्यात 'ह्यांच्याच' गोतावळा 60 जणांचा. पण राजकारणात यायची इच्छा आणि घरात जनसंघाची विचारधारा ह्यातून तयार झालेले रावसाहेब. खरं पाहता 'रावसाहेब' हा शब्द मी ह्याधी पहिला आणि शेवटचा पु.लंच्या व्यक्तिचित्रणात ऐकला होता. पण त्या सदैव 'तिखट' आणि ह्या 'कधीतरी तापट' असणाऱ्या रावसाहेबांमध्ये बराच फरक जाणवला. पाटील साहेबांची मला सगळ्यात रुचलेली गोष्ट म्हणजे- त्यांनी आपल्या गावची भाषा सोडलेली नाही. परुळेकर सरांनी ST एकदा तरी गावात यायची काअस विचारल्यावर साध्या आणि मिश्किल भाषेत पाटील साहेब उत्तरले-"आमच्या गावच्या मारुतीन एसटीच बगीतली नव्हती". तितक्याच मिश्कीलपणे ते पंचायत सभापती झाले असताना त्यांच्या मित्रांना बसत नव्हता आणि त्यांनी ते कसं पटवून दिलं हे ही सांगितलंय. पण हा गावचा हेल जितका शाबित ठेवलाय तितकाच हा माणूस प्रसारमाध्यम ...